विषय:- नम्रपणा
विषय:- नम्रपणा
नम्रता हा सर्वश्रेष्ठ गुण
अंगी असता मोठेपणा |
घेई दुस-यांना समजून
मूळी चालेना खोटेपणा | |१| |
ज्याचे अंगी असे मोठेपण
तोच यातना घे सहन करून |
महावृक्ष कधी पुरात वाहती
तेथे लव्हाळे जाती तगून | |२| |
जया अंगी नम्रपणा असे
तोच खरातर उभा दिसे |
अहंकार करीता सर्व नाहिसे
क्षणात मनाला लागलेसे पीसे | |३| |
लीनता नसे दिनपणा कधी
शोभून दिसतो गुणवान खरा |
तेज प्रकटते प्रसन्न चित्ताने
प्रवाही होय निर्मळ तो झरा | |४| |
नम्रपणा वा नम्रता हा सर्वश्रेष्ठ गुण सर्वांकडे असत नाही.प्रत्येकाला देवानं काही ना काही इतरांच्या तुलनेत जास्त दिले तर आहे. पण म्हणून त्याचा गर्व करुन इतरांना कमी लेखणं हा सर्वात मोठा दुर्गुण . हेच या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे!
