STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational

4  

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational

विषय:- निसर्गाची किमया

विषय:- निसर्गाची किमया

1 min
236

हिरवेगार कुठे नीळसर डोंगर 

खळखळ त्यातून वाहे जलधारा |

सफेद ढग दिसतात उठून नभी

टाकतो मोहवून सारा हा नजारा | |१| |


निवांत क्षणी जावे तेथे अनुभवाया

निसर्गाची किमया मंत्रमुग्ध होऊन |

दृढ व्हावे पर्वतांसारखे ,शांतता

शीतलता घ्यावी निर्झरांत पोहून | |२| |


विशाल व्हावे आपलेही मन

विस्तीर्ण आकाशाकडे पाहून |

नितळ निर्झरासम व्हावे विमल

सानिध्यात निसर्गाच्याच राहून | |३| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational