*विषय - बुद्ध आणि धम्म*
*विषय - बुद्ध आणि धम्म*
आली वैषाख पोर्णिमा
सूर्यबुद्ध जन्मा आले
विश्व लयास चालला
मायबाप छत्र गेले
सत्य अहिंसा समता
मूलतत्त्व अष्टांगिक
विश्वंभर बोधिवृक्ष
ज्ञानी बुद्ध अलौकिक
युद्ध नको बुद्ध हवा
यावे जन्मास गौतमी
दया क्षमा शांती बुद्ध
वाचणार युद्धभूमी
अंधारल्या जगातच
सूर्यासम बुद्ध दुवा
चढे अज्ञानी बुरशी
बुद्ध उद्धारक व्हावा
विज्ञानाचा साक्षात्कार
सत्य मार्ग धम्म नवा
बोधिसत्व दिव्यदाता
जगालाच बुद्ध हवा
धम्मप्रवर्तक बुद्ध
भिमरत्न एक झाला
न्याय देण्या जगी बुद्ध
संविधान प्रकटला
