विषय:- भास नव्हे श्वास गं
विषय:- भास नव्हे श्वास गं
सततच होत राहतो सखे का
तु जवळ नसल्याचा मज त्रास |
मला चांगले कळून चुकलेय गं
तु माझ्यासाठी आहे खास | |१| |
तुझा निरोप घेतांनाच का मी
सोडतो सारखा उच्छवास ?|
मला का सखे नेहमी वाटतो
हवहवासा तुझाच सहवास | |२| |
माझ्या तुझ्या भेटीत व्याकूळ
तु ही किती सोडतेस नि:श्वास |
मला आपल्या दोघांच्या प्रीतीवर
अगदी मनापासून आहे विश्वास | |३| |
सखे आता आपल्यात नाही मूळी
असणार फक्त तो फसवा भास |
मी आता तर कायमच राहणार
सोबतीला तुझ्या बनून तुझा श्वास | |४| |

