STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Romance

3  

Prashant Tribhuwan

Romance

विसरा

विसरा

1 min
356


तुम्ही ना सारे विसरा

किती अलगद म्हणे

आली नी गेली क्षणात

जसे घडीचे पाहुणे


दोन क्षणाचे जीवन

एक क्षण साथ होती

विरहात सखे तुझ्या

आसवांची रात होती


कधी मी नाही थांबलो

नाही थांबली तू कधी

रुसण्यात - फुगण्यात

गेली ही जिंदगी अर्धी


व्यक्त नाही झालोय मी

तुझीही अव्यक्त गोष्ट

नाते ना काही दोघांत

तरी विरहाचे कष्ट


विसरुनी गेलीस तू

सांगताना तू विसरा

दोन जीवास जोडतो

स्नेहरुपी हा कासरा


तुला विसरणे आता

नाही मला जमणार

याच वळणावरती

जन्मभर थांबणार


येता आले तुला तर

मीही सोबती असेल

नाही आलीस जरी तू

तुझ्या डोळ्यात दिसेल



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance