विश्वभुषण: तुझे उपकार
विश्वभुषण: तुझे उपकार
बोधिसत्वा... तु एक युगपुरुष
जळलास, स्वतः ज्योतीसम अन्
दिला प्रकाश तमाम आंधळ्यांना
होते इथे सारेच बंदी युगायुगाचे
केले मुक्त तोडुन साखळदंड तयाचे
होतास ज्ञानसुर्य तु....
लोकतंत्र प्रकाश पाडला...अन्
उभारलास स्वतंत्र स्व भारत देश
लिहीलीस राज्यघटना तु जेंव्हा
गिधाडांचे साम्राज्य होते, अन
दिले स्वातंत्र, समता, बंथुत्वाचे...
कधीही न पुसणारे....
राखण्या अब्रु स्त्री ची, तिच्या अस्मितेची
झटलास शेवटच्या थेंबापर्यंत
अन् मुक्त केले त्यांना मनुदास्यातुन
म्हणुनच ...
हे युगपुरुषा...
हे प्रज्ञासागरा..
या देशाने अश्रुपुर जरी वाहीला..
तुझे उपकार फिटणार नाही....
