विश्वास
विश्वास
गेला सारा आखाडा वाहून माझा
उरलं काहीबी नाही सामटीनं..!
लागलाय सराप संसाराला माझ्या
केलं असं कसं त्या सटवी सवतीनं..!
उघड्यावर पाडलं आख्ख बिऱ्हाड माझं
डाव फसवा साधला नियतीनं..!
नेली खरडून काळी माय माझी
पण नाही हरलो अजून मी हिमतीनं..!
पुन्हा भरीन मी ओटी आईची माझ्या
देईल परत ती मला दाम दुपटीनं..!
