STORYMIRROR

vaishali Deo

Abstract

4  

vaishali Deo

Abstract

विश्वास

विश्वास

1 min
323

विश्वास किती हा जगण्या वरचा


जगण्यातल्या काव्यावरचा


विश्वास किती हा तत्वांवरचा


प्राण गेले तरी अढळ निष्ठेवरचा


विश्वास किती हा सत्तेवरचा


पालटली तरी भोगण्यावरचा


विश्वास किती नौकेचा त्या लाटेवरचा


फेसाळलेल्या समुद्रावरचा


विश्वास किती त्या आणाभाकांवरचा


सात जन्म साथ देण्यावरचा


विश्वास किती त्या मातेवरचा


लेकराला मिळणाऱ्या मायेवरचा


विश्वास किती त्या पर्जन्य राजावरचा


बळीराजाला खुणावणाऱ्या शेतीचा


विश्वास किती त्या सुर्यावरचा


साक्षात धरती मातेचा


विश्वास किती त्या आई बापाचा


सांज समयी साथ देणाऱ्या लेकरावरचा


विश्वास किती त्या अनादि अनंता वरचा


न ढळणाऱ्या श्रद्धेवरचा


विश्वासावरच हे जग चालते


तो आहे म्हणूनच श्वास व आस आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract