STORYMIRROR

अन्वय मुक्तेय

Tragedy

4  

अन्वय मुक्तेय

Tragedy

विरहगीत

विरहगीत

1 min
127

आता हळूहळू येतंय शहाणपण,

वेड्यात मला काढल्यावर..

वेदनेवर ती होती फुंकर,

अडखळून स्वतः सावरल्यावर..


आसवांना मी बडतर्फ केले,

हुंदक्यांना आवरायला.. 

पुन्हा वेदनेची बोली लागली,

वेदना जिव्हारी लागल्यावर..


पक्ष्यांच्या या चर्चा रंगल्या,

तू येण्याच्या वाटेवर..

असे कसे हे तार जोडले,

या खांबाचे त्या खांबावर..


मी डोळ्यांनी पाहिलंय,

चौघांनी खांद्यावर घेतलेलं..

तू श्वासांना सुतक लावलं,

मला विसरून जा बोलल्यावर..


आता बांधतो गाठोडे,

मीच माझ्या वेदनेचे..

संपेल सार्‍या या वेदना,

हृदय मातीत पुरवल्यावर..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy