विपर्यास !!
विपर्यास !!
का कोणास कळत नाहीत
माझ्या मनातील भावना
प्रत्येक वेळी विपर्यासच
का होतात ते सांगाना
माझ्या मनात वेगळेच असते
लोक मात्र भलतेच समजतात
नाहक अर्थच चूकीचे घेतात
अनाठायी गैरसमज पसरतात
यामुळे मला कळतच नाही
कोणाशी बोलावे वा न बोलावे
कोणास आवडेल वा नाही
की त्यापेक्षा असेच गप्प रहावे
कधी कधी असं वाटतं रहात
आपल वक्तृत्व आलंय संपत
संवादाची उमेद आलीय सरत
की प्रसिद्धी कमी आहे पडत
परके तर परके पण आपले
पण मला समजू नाही शकत
याचाच तर वाटतोय खेद
म्हणून कोणाशीच नाही बोलत
