विनम्र अभिवादन
विनम्र अभिवादन
अण्णा भाऊ मेलेच नसते
त्यांना मारलंय इथल्या व्यवस्थेनं,
या अण्णाच्या समाजाला
नाही याची मुळीच जाण...
अण्णा भाऊंनी सोसलं खूप
पचवलंही त्यांनी किती..
आयुष सारं वेचलं त्यांनी
त्यांची गाऊ काय महती...
ओळखलं नाही कोणी
नव्हती कुणाची साथ,
स्वर्थसाधू त्या भोंदू नी
केलाच शेवटी घात...
झगडाला,झुजला परिस्थितीशी
मिळविला मान, सन्मान,
काय नी कोण होता अण्णा
गाऊ किती मी गुण..
प्रतिभावंत,लोकशाहीर
अण्णा होते खरे विद्वान,
साहित्यमळा फुलविला अण्णा ने
घेऊन दीड दिवस शिक्षण...
न भुतो न भविष्यती असा
साहित्येकार अण्णा झाला,
शिकवून जगाचे तत्वज्ञान
अण्णा सोडून गेले जगाला...
गातो किर्ती, महती अण्णाची
मनी वाटे मज अभिमान,
विनम्र अभिवादन अण्णा ला
हे विनम्र अभिवादन...
