विजयी तुरा
विजयी तुरा
संयमी धुरा
हाती ती धरा
फितुर झाला
समय जरा...
सृष्टी ती सारी
होई घाबरी
अदृश्य शत्रु
आर्त हुंकारी...
ज्योत सबुरी
पेटवा उरी
दुष्मना हाती
देऊया तुरी...
शत्रु भागता
रण सोडता
विजय पर्व
करू साजरा...
युद्ध जिंकता
शोभेल खरा
शिरपेची तो
विजयी तुरा...
