तू टॉम माझा आणि मी तुझी जेरी
तू टॉम माझा आणि मी तुझी जेरी
जोडी तुझी माझी साऱ्या जगात असे न्यारी,
तू टॉम माझा आणि मी तुझी जेरी...
आभाळभर माया उरी, मला जपतोस फुलापरी,
मग का खोड्या काढून माझी उडवतोस भंबेरी...
कधी सखा जिवाभावाचा तर कधी वाटे वैरी,
लटक्या रुसव्या फुगव्याची गंमतच असे न्यारी...
कधी वाटे गावा तुझ्या कर्तृत्वाचा गोडवा,
कधी वाटे करावा एका रट्टयात आडवा...
स्पंदनात जपले तुला, तुझ्यामुळेच अर्थ माझ्या जीवना,
धरता अबोला मला क्षणभर करमेना...
कोडं तुझ्या माझ्या नात्याचं विधात्यालाही सुटेना...
तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना...

