अजून आहे जगणे बाकी
अजून आहे जगणे बाकी

1 min

237
सरता सरता सरून गेले साल तारखा महिने अन क्षण
सय मधुर मनी वांझ वेदना उरले काही कायमचे व्रण
झाले गेले जुने पुराणे काळावरती तयांचे ठसे
रुतून बसती आत खोलवर क्षणिक जरी हे आयुष्य असे
सुखदुःखाच्या तयार पिशव्या घेऊन काळ उभा तिठ्यावर
स्वच्छ लकेरी सुरेख गातच हुकूम त्याचा सर आँखो पर
अस्तांचलास जाता गभस्ति काजवा प्रकाश गीत ऐकवी
पुढ्यात दर्पण नव आशेचे अभावातही भाव दाखवी
किती सोसिले किती भोगिले हिशोब उगाच जाता मांडू
अजून आहे जगणे बाकी लय श्वासांची पाहे सांगू.