तूच आदिम आणि तूच अंतिम
तूच आदिम आणि तूच अंतिम


संघर्षाची अग्निफुले हाती अन
ज्ञानज्योत पेटवून उरी
तेजस्वी सूर्यासारखी
दैदिप्यमान हो आणि
उजळून टाक सार आभाळ लख्ख...
चराचरात अखंड दुमदुमूदे
तुझ्या कर्तृत्वाचा डंका अन
स्थापित कर तुझं साम्राज्य
अन तुझं अधिपत्य
नव्या युगाच, नव्या दमाचं...
झेप घे आसमंती
महत्वकांक्षेचे वादळ तुडवत
बरस त्या तळपत्या विजेसारखी
अन दोन हात कर
अन्यायाशी निर्भयपणे...
तोड ते साखळदंड
मुकाटपणाच्या बंधनाचे अन
फसव्या रितिरिवाजांचे
रुणझुनुदे पायी नुपूरे स्वातंत्र्याची
घेत मोकळा श्वास...
जळमटे दूर सारून
उपेक्षेची अन दुय्यमतेची
जागं कर तुझ्यातल्या त्या रणरागिणीला
अन धगधगुदे नजरेत तो
करारीपणाचा लाव्हा...
घे पांघरून आभाळ सारं
अन विस्तार तुझं क्षितिज
भर हुंकार परिवर्तनाचा अन्
कळू दे साऱ्या जगाला
तूच आदिम आणि तूच अंतिम...