Ajay Nannar

Inspirational Others


4  

Ajay Nannar

Inspirational Others


विजयादशमी दसरा

विजयादशमी दसरा

1 min 176 1 min 176

विजय यशोगाथेचा सण हा दसरा हो आला 

रणदुंदुभिने डंका केला दसरा सण आला 

ध्येय असावे शिखरावरचे बिकट गाठण्यासाठी 


पाय असावे नियोजनाचे, अन मेहेनतीची काठीची


खेचुनि आणा विजयरथाला दरवर्षी दसऱ्याला 

विजय यशोगाथेचा सण हा दसरा हो आला 


गुढ्या तोरणे वस्त्र सुशोभित अलंकार मंडित 

हर्शोत्साला उतू जाऊ द्या, पक्वान्ने झोडित 

विजयाची ही नशा चेतविल पुनश्च जिद्दीला 

विजय यशोगाथेचा सण हा दसरा हो आला


आपटयाची पानं त्याला हृदयाचा आकार,

मनाचे बंध त्यांना प्रेमाची झंकार,

आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुकार,

"विजयादशमी"च्या निमित्ताने करावा शुभेच्छांचा स्वीकार.


विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्या...

ठेवुनी चेहरा हसरा, दु:ख सगळे विसरा....

सोनियाचा दिन आपुला, तो विजयादशमी दसरा....

करुनी वध रावणाचा, राम राज्याने दिला आसरा....

संपवूनी रावण भ्रष्टाचाराचा, आनंदाने करू दसरा साजरा.....

मराठी संस्कृतीचा ठेउनिया मान

तुम्हा सर्वाना देतो मी सोनियाचे पान....


!!!!सर्वांना दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा!!!


Rate this content
Log in

More marathi poem from Ajay Nannar

Similar marathi poem from Inspirational