वीर जवान
वीर जवान
वीर जवान तुला सलाम
तुझ्या साहसी वृत्तीला,
सीमेवरती लढता लढता
मावळत्या जीवन ज्योतीला..१..
रक्षण करता देशाचा
सेवा तुझी अलौकिक,
प्राणाहून प्रिय तुला
सन्मान देशाचा अधिक..२..
खाकीवर्दी दिसे शोभून
खांद्यावरती तारे चमकती,
तुझ्या व्यक्तिमत्वाची
वर्णू किती आज महती..३..
सदा राही सेवेत उभा
तोडून मोहमाया चे जाळे,
खडतर तुझे जीवन झाले
कठोर संघर्षाचे नियम पाळे..४..
शिस्तीच्या चौकटीतल्या
नियमांचा पालन करता,
जनसामान्यांचा आधार तू
खाकी वर्दीतला पुरस्कर्ता..५..
गुन्हेगारांचा कर्दनकाळ
सुधारक तू समाजाचा,
अन्यायास खोडून काढे
संदेशवाहक तू शांततेचा..६..
सलाम तुझ्या कार्याला
तूझ्या निस्वार्थी सेवेला,
आदर्श तू नव युवकांचा
सलाम तुझ्या पेशेला..७..
