Nalanda Wankhede

Inspirational

5.0  

Nalanda Wankhede

Inspirational

विद्रोह

विद्रोह

1 min
391


विद्रोह म्हणजे मनाची दाहकता

रणरणत्या उन्हाच्या झळेची भीषणता

शवागृहातील निर्लज्ज दुर्लक्षित त्याजता

खोल दरीत पडलेल्या सत्याची नग्नता

आत्मपरीक्षण करायला भाग पडणारी कविता

दरडावरून कोसळणाऱ्या पाण्याची दुग्धता



विद्रोह म्हणजे

सरणावर जळणारी चिता

निवडुंगाच्या झाडाची व्यथा

सत्तेला हादरे देणारी कथा

रक्तपिपासू गोचिडाला मुळासकट संपावणारी लता


विद्रोह म्हणजे

प्रखर सुर्यकिरणांनी पेटवलेली दहशत

धोंढ्यारुपी डोंगराला जागृत करण्याची मशागत

मधमाश्याच्या पोळ्यात घातलेला हात

विसरलेल्या माणुसकीला विद्रोहाची साथ


विद्रोह म्हणजे

अंतरंगात डोकावून पाहण्याचे सामर्थ्य

हरवलेल्या शब्दांना जिवंत असण्याचा अर्थ

भोगलेल्या दारुण व्यवस्थेची विषमता

भेदरातल्या जीवांची दमलेली आक्रोशता


विद्रोह म्हणजे

झंझावाती वादळ

बंडखोरीचा जाळ

संघर्षाची जिवंत नाळ

परखड भाष्याची माळ


विद्रोह म्हणजे

तडफदार मनाची चळवळ

न्याय मिळवून देण्याची तळमळ

खवळलेल्या समुद्राची गरळ

सोसलेल्या नरक यातनांची जळफळ



विद्रोह म्हणजे

कवींच्या हिमतींचे भांडवल

असंतोष्याच्या आखाड्यात माजलेली दंगल

अन्याय अहंकाराचा काढलेला संदल

शोषितांच्या भावविश्वाततली विद्रोही जंगल


विद्रोहाची व्याख्या

जो तो करतो आपल्या परीने

वाक्यातील अर्थ लावतो आपल्या सवडीने

समाजात बदल घडवितो विद्रोह

जिवंतपणाचं लक्षण असतो विद्रोह


वर्चस्वाच्या गालावरची चपराक विद्रोह

बुरसटलेल्या व्यवस्थेेचा गळफास विद्रोह

हक्कासाठी भांडणारे विद्रोही

जगतात खऱ्या अर्थाने

विद्रोहाचा तमगा लावतात गर्वाने

जळजळीत आग ओकतोे विद्रोह

जागृत ज्वालामुखी असतो विद्रोह


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational