विचारु मी कुणाला..
विचारु मी कुणाला..
रणांगणातील ...
हा पराक्रमी शूर योद्धा
शेवटी हारला कसा ?
हे विचारु मी कुणाला..?
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त
कर्तव्यदक्ष,समाजसेवी
कुटूंब वत्सल , स्वाभिमानी
आदर्श नी पावन
ज्यांची होती प्रेरणा आम्हाला...
अभ्यासू, कायदेपंडित
चिरतरुण, साहित्यिक
मार्गदर्शक, विद्वान
होती झेप ज्यांची गगनाला...
मानवता, जिव्हाळा
आत्मीयता,ॠणानुबंधाचा
होता खरा कळवळा
म्हणून काय झाले ते
प्यारे त्या देवाला...
ऐकून त्यांची दुःखद वार्ता
खरे वाटले न कुणाला,
देवाचा त्या मनातून
खरंच फार राग आला
येतात मामा रोज खरोखर
येतात लाख आठवणी आम्हाला...
शेवटी तोच प्रश्न
सतावतो मनाला..
रणांगणाती तो शूर
पराक्रमी योध्दा
हारला कसा ते
विचारु मी कुणाला..
विचारु मी कुणाला...?
