विचारे मना
विचारे मना
भल्या पहाटे लवकर उठून
धावपळीत बस गाठून
अंर्तमन विचारतं माझं काय?
सासू-सास-यांची तीर्थयात्रा
नवरा-मुलांची जंगल सफारी
अंतर्मन विचारतं माझं काय?
मुलांचा पिझ्झा नव-याची मिसळ
म्हातारबाबांना अळणी उसळ
अंतर्मन विचारतं माझं काय?
पन्नास पावसाळे जरा थांब
सगळे आपापल्या मार्गी लागतील
गुढघे कुरकुरले नाहीत तर
तुझ्याकडेही 'मना'पाहीन.
पन्नासवर दहा पाऊस बरसले
मनाला आता विस्मरण झालय
काय मागायचय कोणाकडे
काहीच आता उमगेना झालंय.
