STORYMIRROR

Ganesh Punde

Inspirational

3  

Ganesh Punde

Inspirational

विचारांची भीमजयंती

विचारांची भीमजयंती

1 min
181

ढोल ताशा नको तो डीजे नको जयंती नाचून

भिमजयंती करू साजरी विचार त्यांचे वाचून


माणसाला माणूस बनवलं भीमान

कायद्याला लेखणीत बांधलं भीमान

संविधान बाबाचे हे चालू या मान राखून

भिमजयंती करू साजरी विचार त्यांचे वाचून


महामारीने देशाला जगायला शिकवल

सत्ता पैसा अन् प्रतिष्ठा सार हो झुकवल

माणूसच देव झाला देवाला मागे टाकून

भिमजयंती करू साजरी विचार त्यांचे वाचून


हिरे नवरत्न पिकवली मराठी ही माती

एकसंघ देश व्हावा नको जाती पाती

सोडू सारे द्वेष मनातील देशभक्ती करु ठासून

भिमजयंती करू साजरी विचार त्यांचे वाचून


प्रलयाने पाहिली न धर्म आणि जात 

संकटात माणूस बनतो मदतीचा हात

जाणूनिया हित जनाचे तू सेवा कर मनातून

भिमजयंती करू साजरी विचार त्यांचे वाचून


शिक्षणात हित आहे जाणले भीमान

माणसात देव आहे मानले भीमान

विश्वरत्न शोभला हो करू मुजरा काळजातून

भिमजयंती करू साजरी विचार त्यांचे वाचून

घरी राहुनी करू साजरी विचार त्यांचे वाचून.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational