STORYMIRROR

Yogita Takatrao

Abstract

1  

Yogita Takatrao

Abstract

विचार

विचार

1 min
330

कितीही म्हटलं मी

थांब जरा विचार

तरीही हा डोकावतोच

सारखा सारखा अंतरंगात

नको ते विचार तर

जास्तच थैमान घालतात

नको नको म्हणताना 

परत परत घोळत असतात 

मेंदूला समजावलं नको 

नको करू नको ते विचार 

तरीही पुन्हा पुन्हा येतातच 

नकारात्मक विचारांचे विचार 

बजावले होते मनाला 

कर सकारात्मक विचार 

तरी मध्ये मध्ये करतातच

दुःखी करणारे विचार 

टोचत बोचत राहतात 

तिथल्या तिथे हे विचार 

अंतर्मन बाह्यमन द्वंद्व करतात

तरी निर्लज्जपणे येतातच विचार 

हुसकावून लावले होते त्यांना 

नाही करणार परत विचार 

तरी थोड्या वेळाने येणारच विचार 

मग म्हटलं ह्याचा समतोल राखेन

कुठे कोणता किती करावा विचार 

आपल्याच नियंत्रणात कसा ठेवू विचार 

ह्याच विचारांत करते विचार 

पण करणार मी काय ?

परत हट्टीपणा करतातच विचार 

मला हवे की नको न विचारताच

पुन्हा ठाण मांडून बसतात हे विचार 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract