STORYMIRROR

Ganesh Punde

Inspirational

3  

Ganesh Punde

Inspirational

विचार करू या आता तरी

विचार करू या आता तरी

1 min
204

महामारीची वाढते दरी चला काळजी घेऊ घरोघरी

विचार करू या आता तरी नाही बडा कोणी जीवा परी


एक विषाणू घातक झाला संपर्काने बाधित झाला

बदलून गेले जगणे अचानक रोग नवा जन्मास आला

जीवन बदलले कोरोनाने पोट आले हो हातावरी

विचार करू या आता तरी नाही बडा कोणी जीवापरी


भल्या भल्या ना जेरीस केले होते न्हवते बदलून गेले

काल भेटले आज दिसेनात असले कसले जिने आले

विना तिर अन् तलवारीचा घाव असा हा उरावरी

विचार करू या आता तरी नाही बडा कोणी जीवापरी


नियम पाळू या स्वस्थ राहूया गर्दी टाळू मिळून चला

स्वच्छ राहू या मास्क घालूया पळवून लावू रोग भला

वर्ष संपले तोंड झाकुनी नको चुका घ्या मनावरी

विचार करू या आता तरी नाही बडा कोणी जीवापरी


लस मनाला इच्छाशक्तीची प्रेरणा ही जगण्याची

हिंम्मत देऊन मात करू या शक्ती मिळेल लढण्याची

हरवून देऊ महामारीला विजय मिळवू कोरोनावरी

विचार करू या आता तरी नाही बडा कोणी जीवापरी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational