STORYMIRROR

Dipali patil

Tragedy

3  

Dipali patil

Tragedy

विभाजन

विभाजन

1 min
127

निसर्गरम्य, शांत, बहरलेली 

माझी भू माता, धरित्री 

नयनरम्य दृश्ये सुंदर 

पवित्र माझी धरा पटते खात्री 


मानवरूपातला दानव हा 

लागली नजर नराधमाची 

केले विभाजन सीमांनी 

भाग केले आपल्या मातेचे 


देशा देशात सत्ता वाद 

सीमांवर सारखे गोळीबार 

सततची धूर्त शीत युद्धे 

शस्त्रात्रे हमले वारंवार 


मनोवृत्ती खचली माणसाची 

सत्ता लालसा कारणी ठरली 

इतिहास देतो साक्ष ह्याची 

सामान्य मनुष्याला ठिणगी बाधली 


जात, पात, धर्म, पंथ 

वाद हा माणसात निरंतर 

अंध अभिमान नुसता 

श्रेष्ठ कनिष्ठतेतुन मन पेटणार 


एकच मानवधर्म खरा 

बंधने घालू शस्त्र निर्मितीवर 

समजाऊ महासत्ताना मानवता 

करू शिडकाव प्रेमाचा विश्वपातळीवर 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy