व्हॅलेंटाईन डे...!
व्हॅलेंटाईन डे...!
व्हॅलेंटाईन डे.....!!
प्रत्येक क्षणन क्षण माझ्या
जीवनातला व्हॅलेंटाईन असतो
हे त्रिकाल सत्य ती जाणते
आणि मला आय लव्ह यु म्हणते
गेला क्षण मी आठवत नाही
कालचा दिवस मी जाणत नाही
उद्याचा दिवस गृहीत धरत नाही
तिच्याविना एकही क्षण सरत नाही
वर्तमानातल प्रेम आमचं
सदा टवटवीत असत
त्याला कोणत्या व्हॅलेंटाईनच्या
कुबड्यांचं कौतुक नसत
कधीही कोठेही केंव्हाही
प्रेम आमचं प्रेमच असत
दिसत तस नसत हे खरं असत
प्रेमाला आमच्या कसलच बंधन नसतं
आम्ही असतो कोठे राहतो कोठे
बोलतो कसे हसतो कसे भेटतो कसे
हे आम्हालाही माहीत नसतं
तरीही आमचं प्रेम अबादीत असत
मुक्त आचार विचार समाचार
सार कस मोकळं चाकळ
शब्दांच्या पलीकडचं भावनांच्या अलीकडच
आतल्या आतच असत सगळं.....!!!

