वेळ मिळत नाही
वेळ मिळत नाही
व्यस्त झाले आहे जीवन इतके स्वप्नांच्या मागे पळताना
वेळ मिळत चं नाही हल्ली स्वतःसाठी रोज जगताना
सरत जाते दिवसरात्र ते क्षण हातातून निसटून जातात
आनंदाच्या वाटा रोज जगताना कुठे लुप्त होऊन जातात?
आयुष्य चालत राहते पुढे आपणही पुढे जात राहतो
वेळ मिळत नाही म्हणून आपल्या माणसांना विसरून जातो
वेळ मिळत नाही आणि वेळ कधीच मिळत नसतो
वेळातून वेळ काढून चं जगण्याचा आनंद घ्यायचा असतो
