वेदना मनातल्या...
वेदना मनातल्या...
वेदना मनातल्या, का जिरवाव्या आपण,
कसा निचरा हाेईल, कसं माेकळं हाेईल मन
वेदना मनातल्या, उगीच का साठवाव्या,
बाेलून माेकळं हाेवू, कशा त्या साेडवाव्या
वेदना मनातल्या, राईचा पर्वत नसावा,
सहकार्याने त्यासाठी, एकमेकाचा हात धरावा
वेदना मनातल्या, आंतरिक संवाद व्हावा,
आपल्या समजून दुसऱ्याच्या वेदना समजाव्या
