STORYMIRROR

Raghu Deshpande

Inspirational

3  

Raghu Deshpande

Inspirational

वेड्या आईची वेडी माया....

वेड्या आईची वेडी माया....

1 min
373

सगळं दिले आहे तिला

हातो पाती नोकर चाकर, 

टिव्ही फॅन, भांडे कुंडे 

पैसा अदला कपडे लत्ते 

तरी आपलं चालूच ठेवते 

तू दिसला कीं बर वाटते...! 


दोन दिवस झाले कीं

चालू करते टूमनं

कधी येणार कधी येणार

सततचे विचारणं, 

अशात तू आलाच नाहीस

सगळ ठीक आहे ना तिकडं..?


कशा कशा बातम्या बाबा 

घोर जिवाला लागतो 

कशाच जेवण जात 

घास घशात अडकतो 

नातू जरा खोडकर आहे 

लहाणपणी तुहीं होतास 

मारू नको बरं त्याला...! 


रविवारी नक्की ये पण 

तुला सुट्टी असतें ना 

काही नाही, नाताला कपडे 

नातीला कानातले घेतलयं 

सुनबाईला पैसेच देते 

तिला काही आवडायचं नाही 

मी घेतलेलं..... ये मग... 

मी वाट पाहतें....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational