वाटचाल
वाटचाल
तांत्रिकतेच्या जगात माझे
पाऊल पुढे पुढे पडते आहे
माणूसकीच्या जगात मात्र
मी मागे मागे पडते आहे ....
वेगवेगळे शोध सारे
अंगवळणी पाडून घेते आहे
जुन्या जाणत्या संस्काराच्या
गोष्टी फेकून देते आहे....
पैसा पैसा करीत मी
त्याच्याच मागे धावते आहे
आयुष्यातील मोद , सुखाला
नकळत पारखी होते आहे ....
मिनीटा मिनीटाला मी
घड्याळाला जपते आहे
मोबाईलमध्ये डोके खुपसून
शब्दाला महाग होते आहे ....
