STORYMIRROR

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Inspirational

4  

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Inspirational

वाटाड्या

वाटाड्या

1 min
28K


वाटाड्या चालला सोडूनी गांव

अजूनही त्याची सुटेना हाव


वाटाड्या जेव्हा गावात आला

ठाऊक नव्हते रस्ते त्याला


बिनडोक काही होते लोक

'नकाशे’ त्यांनी दिले बिनधोक


वाटाड्या दारोदार भटकला

आवडला कुणाला, कुणा खटकला


तुडवी वाटाड्या सारे रस्ते

गिळू लागे गांव आस्ते-आस्ते


'शिकारीला' जेव्हा वाटाड्या जाई

सारीकडे त्याचे 'स्वागत' होई


दबा धरुनी गुहेत बसे

बेसावध सावज अलगद फसे


चोहीकडे झाला गाजावाजा

वाटाड्या बनला गावचा राजा


घेऊन कवेत सारा गांव

मारु लागला बसूनी ताव


दिवसरात मोजी तो नाणी

नवी -नवी सदा बनवी गाणी


जमवी वाटाड्या गडगंज माया

ऐसपैस झाली त्याची हो काया


वाटाड्याला स्तुती आवडे भारी

नवे- नवे तो 'विक्रम' करी


वाटाड्याचं बदलत चाललं रूप

अनितीचा केला चिखल खूप


वाटाड्या लावे गावाची वाट

सारे गांवकरी पडले चाट


गावाला जेव्हा कळला धोका

गावक-यांनी साधला मोका


पाणी गेले जेव्हा डोक्यावरूनी

जाब विचारला लोकांनी धरुनी


गावाने आरडाओरडा केला

घोटाळा झाला हो, घोटाळा झाला


गावक-यांनी उलटवला डाव

वाटाड्या म्हणे कसा हा गांव


प्रगतीपथावर मीच हो नेले

बदनाम का बरे मलाच केले


निषेध सा-या गावाने केला

आम्हाकरिता, म्हणे तू मेला


चाचपून पाही सा-या नाड्या

वळकटी बांधून निघे वाटाड्या


पोखरला गांव आत बाहेरून

वळून पाहतो तरीही अजून


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational