वाट पाहते
वाट पाहते
आता तो अचानक येईल
मला चिंब भिजवून जाईल
पावसाकडे मी वेडी,
डोळे लावून बसली आहे
धरती सारखी मी ही,
सख्या बघ सजली आहे.
तू येशील तसा,
साजन ही माझा येईल
पाऊस त्याला प्रिय,
अन पावसातली मी
गालावर तेव्हा अलगद,
मोती सजतील
तू आणि सखा एक सारखा,
मी अंगा अंगा वर झेलीन
आस तुझी ही सोसवेना
पापण्या आड अश्रू आता लपून राहिना
समाप्त

