STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Abstract Tragedy Thriller

3  

manisha sunilrao deshmukh

Abstract Tragedy Thriller

वाट पाहणे....

वाट पाहणे....

1 min
536

वाट पाहावी लागते ती असते प्रतिक्षा

पाणी येण्याची शेतकरी करतो प्रतिक्षा

स्वप्न वाट बघतो ते झोपेची

चंद्र वाट बघतो ते कळी उमलण्याची

सकाळ वाट बघते ती सूर्य उगवण्याची

प्रत्येक जण कोणाची ना,

कोणाची वाट बघतच असतो.......


          कोणीतरी आपल्यासाठी झुरतच असते

           तेच तर वाट पाहण्याची मज्ज्या असते

             माणूस वाट पाहतो मरणाची

             पाणी वाट बघतो वाहण्याची

             निसर्ग वाट बघतो पाण्याची

             रस्ता वाट बघतो त्याच्या वळणाची

             प्रत्येक जण कोणाची ना, 

             कोणाची वाट बघतच असतो.......


माणूस वाट बघतो कामाची

मेहनत वाट बघते भुकेची

जमिन वाट बघते पाऊसाची

आई वाट बघते छोट बाळ चालण्याची

बाबा वाट बघतात मुलाने हातभार लावण्याची

प्रत्येक जण कोणाची ना 

कोणाची वाट बघतच असतो.......



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract