वास्तव
वास्तव
माझ्या स्वप्नील रात्रीत
येत नाहीत चांदण्या
कधी कठोर वास्तव
येते मजला भेटण्या
कुणी उपाशी अर्भक
आर्त रडते दुःखाने
कुणी कमी प्रकाशात
वाचे पुस्तक हट्टाने
असे मातेला काळजी
उद्या काय शिजवावे?
उद्या परीक्षा बाळाची
पैसे धन्याला मिळावे
अशा स्वप्नांतून मला
खाडकन् जाग येते
स्वप्ने शिकवती मला
जाण कर्तव्याची येते
