STORYMIRROR

Chandan Pawar

Inspirational

4  

Chandan Pawar

Inspirational

वारसा..

वारसा..

1 min
270

आई..लेक मी तुझी

ठेऊ नको मनी वैर..

प्रेमाने जवळ घे मला

नाही कोणी मी गैर..

       पाटी-पेन्सिल दे मला

       मी पण शाळा शिकणार..

       स्त्री जीवनातील काळा

       अंधार मी दूर सारणार..

मी पण होईन आनंदीबाई

नाव तुझे उंचावेल..

ताराराणी-येसूबाई होऊन

कर्तबगारी माझी दाखवेल..

           सांग ना बाबांना.. मला

          जवळ घेऊन कुरवाळा..

           मी नेहमी दुर्लक्षित..   

         भाऊच तुमचा लाडीवाळा..

सोडून गेले सासरी जरी

चालविन तुझा वारसा..

आडनाव बदलले तरी

तूच माझा वारसा..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational