वार्धक्य अभंग
वार्धक्य अभंग


कशी सांगू बाई!! जीवनाची व्यथा!!
दुःख मयी कथा!! माझ्या साऱ्या!!
सुखाने संसार!! मी थाटला होता!!
पती साथ होता!! त्या वाटेत!!
निःस्वार्थ झिजली!! चिमुकल्यांसाठी!!
त्यांच्या सुखासाठी!! दिन रात!!
दिवस गेली ती!! माझे सुखाचे गं!!
साठवी पार गं!! झाली आता!!
आधार पाहिजे!! मला या वयात!!
जवळ नाहीत!! माझ्या कोणी!!
मुले आहे माझी!! पण कामी नाही!!
सांभाळ माझाही!! नको वाटे!!
आरामाचे वय!! नातू वागवाचे!!
मी खेळवण्याचे!! फिरण्याचे!!
अशी मुले नाही!! कोणाचीही निघो!!
आईला समजे!! मोठे ओझे!!
सपना म्हणे गं!! नका असे करू!!
आई बाबा मारू!! सांभाळा रे!!