STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

वार

वार

1 min
346

जीवन हा तर संग्रामच

वारांवरी झेलायचे वार

किती सोसायचे नकळत

कळतेपणी होई प्रहार


काही अपेक्षित टीकात्मक

काही तिरकसपणे वार

मन माझे निखळ सुंदर

भेदक त्याला असे प्रहार


सच्चा मित्र होई छुपा शत्रू

ब्रूटसचा दिसे तिथे वार

दुःख प्राणांतिक हो तेधवा

मैत्रीचा सोसवेना संहार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract