वाळूत मारल्या रेघा
वाळूत मारल्या रेघा
वाळूत मारल्या रेघा
त्या बनल्या ललाटरेखा
वरून लहर फिरता
पुसून गेल्या सा-या....
दाट धुक्यातील थेंबांनी
माती भिजून गेली
दवकण स्वप्नांची
पानावर थिजून गेली
एक वाट... पण थिटी होती
बाकी हरवल्या सा-या....
ओल्या मेंदीचा वास घुमतो
हळद ही ओली रचते,
कळी गुलाबी गालावरची
खुदकन उगीच हसते!
पण एक क्षण आला त्याने
आशा विरल्या सा-या....
उजाड रानामध्ये....
काजवा दूर चमकतो
अंधारातही एक किरण
जणू नजरेला दिसतो....
त्याने क्रांत मनाच्या हाका
शांत केल्या सा-या.....
