वाहून गेले
वाहून गेले
वाहून गेले...
वाहून गेले अस्तित्व ,
सत्य हेच होते ,
सत्यही वाहून गेले तेव्हा,
माणसांचेच जेव्हा पेच होते...
विषय विषयातून शोधला,
उरले सारांश होते,
सत्यही वाहून गेले तेव्हा,
शब्दांना जेव्हा शब्दांचे जाच होते...
देवत्व विसरले कधीचे,
ढोग्यांनी सोंग घेतले होते,
सत्यही वाहून गेले तेव्हा,
दगडाला जेव्हा देवत्वाचे काच होते...
उरल्या आठवणी परतीच्या,
घरी नांदले होते,
सत्यही वाहून गेले तेव्हा,
आपल्या रुपात परक्यांचे नाच होते...
