वाह रे दुनिया
वाह रे दुनिया
आईच्या कुशीत देखील
ती सुरक्षित नसते
कारण गर्भपाताची तलवाार
तिच्यावर लटकत असते
हे सुंदर जग पहावं
असं तिला पण वाटतं
पण बलात्काराचं नाव ऐकताच
डोळ्यांतील पाणीसुद्धा आटतंं
आपणही फुुलपाखरांंप्रमाणे बागडावं
असंं तिला पण वाटतं
पण हा समाज काय म्हणेल
या विचारांनी मनात काहूर दाटतं
मुलींचं आयुष्य म्हणजे
त्या कस्तुरीमृगासारखं असतं
स्वातंत्र्य स्वतः जवळ असूनही
नेहमी दूरच आहे असं भासतं
तिलाही वाटतं आपण
शिकून आत्मनिर्भर बनावं
पण या विचारहीन
समाजाला कोणी समजवावं
इतरांची मुलगी म्हणजे
वस्तू खेळण्याची
आणि स्वतःची मुलगी म्हणजे
साक्षात लक्ष्मी घरची....
वाह रे दुनिया...!
