बाप
बाप
लेकरांच्या घासासाठी
स्वतः उपाशी राहिला
मुलांच्या सुखासाठी तो
आयुष्यभर झटला...
फाटक्या बनियनची
लाज त्यां वाटली नाही
मुलांच्या भविष्याचीच
स्वप्ने तो पहात राही...
कुटुंबाच्या सुखासाठी
बांधिलकी आयुष्याची
अपेक्षाही नाही केली
कधी कोणत्या प्रेमाची ...
शिकवावे लेकरांना
स्वप्न एक जपे मनी
वाट बोचरी काटेरी
चालला तो अनवाणी..
.
कष्टाने तो फुलवितो
कातळसे माळरान
लेकरांच्या भोवताली
भिरभिरे त्याचे मन...
झुंजताना संकटाशी
दोन हात तो करतो
जाणवून नाही देत
एकलाच तो राबतो...
नाही कधी उमजत
लेकराला बापपण
बाप झाल्या विना नाही
येत त्या बापाची जाण
जन्म सारा वेचुनिया
फुलवितो तो जीवन
जन्मदात्या बापाची त्या
जपा मनी आठवण ...