सोनेरी पहाट...
सोनेरी पहाट...
गेला तो मावळतीचा दिवस
अंधकार झााला त्या निराशेचा
उगवली सोनेरी पहाट
सोबत घेऊन किरण आशेचा
अस्तांचलगाामी दिनकराकडून
आपणही काहीतरी शिकावे
रोज मावळताना पुुुुन्हा
नव्या सामर्थ्याने जगावे
नवा दिवस देतो नवी ऊर्जा
करण्या सर यशाचा शिखर
नव्या जोमाने पून्हा कार्य करावेे
हेच तत्त्व सांगतो मावळतीचा प्रभाकर
