STORYMIRROR

Mantasha Pathan

Others

5  

Mantasha Pathan

Others

वाह रे दुनिया

वाह रे दुनिया

1 min
582

आईच्या कुशीदेखील 

ती सुरक्षित नसते 

कारण गर्भपाताची तलवार 

तिच्यावर लटकत असते... 


हे सुंदर जग पहावं 

तिला पण असं वाटतं 

पण बलात्काराचं नाव ऐकताच 

डोळ्यांतील पाणीसुद्धा आटतं... 


आपण फुलपाखरांप्रमाणे उडावं 

असं तिलाही मनोमन वाटतं 

पण हा समाज काय म्हणेल 

या विचारांनी मनात काहूर दाटतं... 


मुलींचं आयुष्य म्हणजे 

त्या कस्तुरीमृगासारखं असतं 

स्वातंत्र्य स्वतःजवळ असूनही 

नेहमी दूरच आहे असं भासतं....


तिलाही वाटतं आपण 

शिकून आत्मनिर्भर बनावं 

पण या विचारहीन 

समाजाला कोणी समजवावं ...?


इतरांची मुलगी म्हणजे 

वस्तू खेळण्याची 

आणि स्वतःची मुलगी म्हणजे 

साक्षात लक्ष्मी घरची ,

वाह रे दुनिया....! 


Rate this content
Log in