मी गमवलेली व्यक्ती...
मी गमवलेली व्यक्ती...
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
करुनी आम्हां पोरके
गेला तुम्ही दूर कुठे ?
तुमच्याविना आम्हांला हा
राजवाडा पण सुना वाटे
जेव्हा होता आमच्यासोबत
वेगळीच एक शान होती
का गेला सोडूनी तुम्ही
बायकापोरं तुमची रडती
तुम्ही असताना वेगळी
ओळख होती नावाला
सांगा ना बाबा आम्ही
येऊ कुठे भेटायला ?
येता आठवण तुमची
हृदयाचे होते पाणी पाणी
गेला सोडूनी अर्ध्यावरती
बाप लेकीची ही कहाणी
ब
ाबांच्या असण्याने वेगळी
जगण्याची हिंमत मिळते
गमवलं आम्ही तुम्हांला
आज त्याची किंमत कळते
देवा, काय चूक होती सांग
आम्हां निष्पाप लेकरांची ?
कोणता न्याय केलास तू
करून पोरकी लेकरं त्याची ?
देवा तूच सांग आता
मी बाबांना कुठे शोधू
बाबांविना माझ्या आयुष्याचे
लक्ष कसे मी वेधू...?
देवा, आता फक्त एकच
प्रार्थना मी करते तुला
एवढ्या लहानपणी नको रे
पोरकं करत जाऊ कोणाला ...