माझे बाबा....
माझे बाबा....
बोटांचा आधार देऊन
ज्यांनी चालायला शिकवलं
ते माझे बाबा...
यशात कौतुक केले अन्
अपयशात पाठीशी उभे राहिले
ते माझे बाबा...
स्वतः उपाशी राहून
मला मायेचा घास भरवला
ते माझे बाबा...
प्रत्येक संकटामध्ये मला
खंबीरपणे साथ दिली
ते माझे बाबा...
दिवसरात्र कष्ट करून
माझ्यासाठी स्वप्न रंगवली
ते माझे बाबा...
माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी
स्वतःचा वर्तमान बदलला
ते माझे बाबा...
एवढंच काय तर
माझ्यासाठी साऱ्या जगाचा
विरोध केला
ते माझे बाबा...
मी देव नाही पाहिला पण
ज्यांना देवाच्या रुपात पाहिलं
ते माझे बाबा...
