STORYMIRROR

Mantasha Pathan

Tragedy

3  

Mantasha Pathan

Tragedy

गर्भातील मुलीचे बोल....

गर्भातील मुलीचे बोल....

1 min
550

आई, सांग ना तू तरी 

काय होता माझा दोष...? 

का म्हणून मी गर्भात 

असतानाच केला आक्रोश...?


मलाही हे सुंदर जग 

डोळ्यांनी पहायचं होतं गं

मला पण माझ्या बाबांची 

निरागस परी बनायचं होतं गं... 


समाजामुळे मला गर्भातच 

का गं तुम्ही मारता..? 

या समाजाच्या शिक्षेचा दंड 

का गं मला ठोठावता...? 


आई, काय होता 

असा माझा गुन्हा..? 

का म्हणून गर्भातच मिटवला 

हा निष्पाप पान्हा...? 


मजला माहित आहे गं

सर्वांना कुलदीपक हवा 

मी पण जन्मास येऊन 

देईन आयुष्यास अर्थ नवा....


तुझ्याच संस्कारांची 

घेऊन येईन शिदोरी... 

का उगाच मारता गं 

तुम्ही गर्भातच पोरी...?


येऊन पोटी तुझ्या 

आयुष्याची उधळण करेन गं... 

शिकून, सवरुन नाव तुमचं 

खूप मोठं करेन गं....


खूप झालं आता 

नका ना मुलींना मारु...

उमलू दे ना त्या कळीला 

मग जीवनात सुगंध पसरू....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy