गर्भातील मुलीचे बोल....
गर्भातील मुलीचे बोल....
आई सांग ना तू तरी
काय होता माझा दोष
का म्हणून मी गर्भात
असतानाच केला आक्रोश ...?
मलाही हे सुंदर जग
डोळ्यांनी पहायचं होतं गं
मला पण माझ्या बाबांची
निरागस परी बनायचं होतं गं...
समाजामुळे मला गर्भातच
का गं तुम्ही मारता..?
समाजाच्या शिक्षेचा दंड
का गं मला ठोठावता..?
आई, काय होता
असा माझा गुन्हा
का म्हणून गर्भातच मिटवला
हा निष्पाप पान्हा...?
मजला माहित आहे गं
सर्वांना कुलदीपक हवा
मी पण जन्मास येऊन
देईन आयुष्यास अर्थ नवा
तुझ्याच संस्कारांची
घेऊन येईन शिदोरी
का गं उगीच मारता
तुम्ही गर्भातच पोरी...?
येऊन पोटी तुझ्या
आयुष्याची उधळण करेन गं
शिकून सवरून नाव तुमचं
खूप मोठं करेन गं...
खूप झालं आता
नका ना मुलींना मारू
उमलू दे त्या कळीला
मग जीवनात सुगंध पसरू...
