वाघिणीचे दूध शिक्षण
वाघिणीचे दूध शिक्षण
सपकाळ ते आंबेडकर
यातनादायी प्रवास
'शिपाई नाही, पाणी नाही'
ओरबाडे बाल मनास,
स्पृश्य-अस्पृश्य तिरस्काराचा
तिडा ना सुटे या वयास,
शिक्षणाच्या ध्यासाने
देई चालना बुद्धी जीवास.
वाघिणीचे दूध हे शिक्षण
प्राशन करी तोच गुरगुरी
मन पवित्र करी या शाळा
उत्तम नागरिक तयार करी
सांगे भीमा शस्त्र आहे शिक्षण
करण्यास सामना आव्हानांचा
मिटवण्यासाठी विषमता देशातून
बळकट करी हात युवकांचा
उंचावण्यास सामाजिक प्रगती
विचारांना करा पोलादी बळकट
देऊनी धारदार सुरी इतकी
मजबूत करून आपले मनगट
