STORYMIRROR

Latika Choudhary

Inspirational

2  

Latika Choudhary

Inspirational

वादळात दीप

वादळात दीप

1 min
3.1K


देव्हारा देहाचा ,करंडा मनाचा

वादळात दीप, सांभाळत आहे

पिढया न पिढ्या , जिवाच्या घड्या

हिरद गाडत, जोपासत आहे

वाट ही भुकेची, तहान मायेची

वात्सल्य जपत, गोंजारत आहे

मातीचं सोनं, जीवाचं रान

काळीज कापत, गोंजारत आहे

डोळ्याचा आसू, ओठावर हसू

सपन जपत, जोजवत आहे

जाते जीवनाचे, धान भावनांचे

आयुष्य दळत, आवरत आहे

दळता गावलं, आनंद पावलं

जीवन संगीत, रंगवत आहे

नाव, नातं-गोतं, माणसाची जात

बाईपण जपत, शृंगारत आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational