वादळ
वादळ
वादळ सुटून जोरात
संकट धावून आले
क्रोधाच्या आगीत
सर्व नाते वाहून गेले
थांबवता थांबेना
सगळं संपून गेले
हवेत माझे सगळे
स्वप्न मी हरवून नेले
होणार नाही आता
आयुष्यात स्वप्न पूर्ण
हाताने मी केला
जीवनाचा हा चूर्ण
रडावं लागते त्यात
चूक असते माझी
इतरांना बोलू काय
चूक नाही त्यांची
