STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

वाढदिवसाच्या शुभेच्छा.!

वाढदिवसाच्या शुभेच्छा.!

1 min
24.5K


तुझी माझी संगत

सखे साता जन्माची

असेना ग साथ जीवनी

बोलाच्या कडीभाताची


होऊ नको तू

क्षणो क्षणी बेजार

असताना ग दैव कृपेने

सुंदर सोन्याचा शेजार


सरले कष्टाचे दिन सारे

वाहतील सौख्याचे वारे

तुझे माझे प्रेम न्यारे

पहा जरा किती प्यारे प्यारे


नवा संकल्प करू सखे

आपण दोघे आनंदाने

सरतील बघ दिन सारे

साथीत गुण्या गोविंदाने


तो परमेश्वर ही ऐकतो

सारे कान टवकारून

शुभ आशीर्वाद पहा

देतो ठेऊन हात शिरावर....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational